रामायण डेव्हलप युवर लाइफ स्किल्स
‘रामायणा’चे वाचन, मनन व चिंतन आपल्याला कसे जगायचे, हे शिकवत असते. वर्षा परगट यांचे ‘रामायण ः द आर्ट ऑफ लिव्हिंग’ या पुस्तकातून खरेच आजच्या पिढीला रामायणातले प्रसंग नक्कीच मार्गदर्शक ठरतील. ‘रामायणा’तून शिकावी जीवनशैली. कारण, आजच्या जीवनशैलीत फक्त घड्याळ्याच्या काट्यावर चालणारी स्पंदने आहेत. जीव स्वस्थ नाही, प्रचंड ओझे डोक्यावर घेऊन माणूस सतत धावतो आहे. त्यामुळे हृदयविकाराचे प्रमाण वाढते आहे. चिंता जाळते आहे, रक्तातल्या शर्करेचे प्रमाण वाढतेय, वैयक्तिक, सामाजिक स्तरावर प्रश्न वाढताहेत. याचा परिणाम रक्तदाबावर होतो आहे. सगळे प्रश्न ‘रामायण’ वाचून सुटतील अशी आपली धारणा नाही. पण, प्रेरणा नक्की मिळेल. वर्षाने ‘रामायण : द आर्ट ऑफ लिव्हिंग’ या द्विभाषिक पुस्तकातून उत्तम मार्गदर्शन केले आहे.