विपणन आणि जाहिरात
प्रस्तुत पुस्तकात विपणनाचा परिचय, संकल्पना, कार्यांचे वर्गीकरण, सामाजिक कार्ये, नैतिकता, महत्त्व, प्रक्रिया तसेच ग्रामीण विपणन, हरित विपणन, बाजारपेठ, खरेदीदार व ग्राहकांचे वर्तन इ. विपणनातील महत्त्वपूर्ण संज्ञांची मुद्देसूद मांडणी करण्यात आलेली आहे. याचबरोबर जाहिरात, जाहिरातीची ओळख, अर्थ, व्याख्या, स्वरूप, व्याप्ती, महत्त्व, जाहिरातीचा मसुदा, घटक, गुणवैशिष्ट्ये, प्रकार, बजेट, जाहिरात एजन्सी, जाहिरातींवरील नियंत्रण, नियम, ऑनलाइन जाहिरात, मोबाईल जाहिरात इत्यादी नाविन्यपूर्ण मुद्यांची विद्यार्थ्यांना ओळख व्हावी व वाचकांच्या विचारांना स्वतंत्र दिशा मिळावी, या हेतूने साध्या, सोप्या भाषेत मांडणी करून त्यांचा सखोल व सूक्ष्म अभ्यास करण्याचा प्रयत्न केला आहे.