बँकिंगची तत्त्वे आणि पद्धती
सदरील पुस्तकात बँकांची उत्क्रांती आणि विकास, रचना, कार्ये व सेवा, आर्थिक विकासात बँकेची भूमिका, वर्गीकरण, आधुनिक बँकिंग, घाऊक आणि रिटेल / किरकोळ बँकिंग, मर्चंट बँकिंग, युनिव्हर्सल बँकिंग, आभासी बँकिंग, भारतातील पेमेंट पद्धतीचा उदय, इसीएस, आरटीजीएस, एनइएफटी, सीटीएस, एनइसीएस, इंटरनेट बँकिंग, मोबाइल बँकिंग, एटीएम सेवा, व्यापारी बँका अर्थ, व्याख्या, महत्व, प्रकार. केंद्रीय बँक अर्थ आणि कार्य, केंद्रीय बँक आणि व्यापारी बँक यातील फरक, भारतीय अर्थव्यवस्थेत केंद्रीय बँकेची भूमिका तसेच त्यासंबंधीच्या महत्त्वपूर्ण माहितीचे सविस्तर विवेचन केलेले आहे. साध्या, सोप्या भाषेत, मुद्देसूदपणे ठळक बाबींच्या नोंदीसह लेखन केलेले असल्याने विद्यार्थ्यांना अध्ययन कौशल्यासाठी व शिक्षकांना अध्यापनासाठी निश्चितच फायदा होईल. तसेच पुस्तक लिहितांना विविध स्पर्धात्मक परीक्षेला उपयुक्त ठरू शकेल याचा विचार केलेला आहे. संबंधित विषयाचे अभ्यासक, विद्यार्थी व तज्ज्ञ संशोधकांना याचा फायदा व्हावा, या व्यापक दृष्टिकोनातून सदरील ‘बँकिंगची तत्त्वे आणि पद्धती’ या पुस्तकाची निर्मिती करण्यात आली आहे.