शेअर बाजाराच्या मूलभूत संकल्पना
प्रस्तुत पुस्तकात बचत व गुंतवणूक त्याचे प्रकार, पर्याय, फायदे, तोटे, मर्यादा. शेअर बाजाराचा अर्थ, व्याख्या, वैशिष्ट्ये, प्रकार, फायदे तोटे, मर्यादा. शेअर बाजारातील आयपीओ, डिमॅट खाते, शेअर लिस्टींग, ग्रे मार्केट, दुय्यम बाजार इत्यादी. म्युच्युअल फंड, संकल्पना, म्युच्युअल फंडात गुंतवणुकीच्या पद्धती, म्युच्युअल फंडचे प्रकार, फायदे, तोटे आणि मर्यादा यांची प्राथमिक ओळख अत्यंत साध्या-सोप्या भाषेत आणि आवश्यक तेथे इंग्रजी भाषा वापरून शेअर बाजारातील संकल्पना स्पष्ट करण्यात आल्या आहेत. त्यामुळे मातृभाषेतून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तसेच शेअर मार्केट समजून घेणाऱ्यांसाठी 'शेअर बाजाराच्या मूलभूत संकल्पना' हे पुस्तक निश्चितच उपयुक्त ठरेल. याचबरोबर सदरील पुस्तक हे स्पर्धा परीक्षांच्या दृष्टिकोनातून तयार केलेल्या अभ्यासक्रमावर आधारीत असल्यामुळे अन्य विद्यापीठांतील विद्यार्थी व स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थी, प्राध्यापक व शेअर मार्केटविषयी उत्सुकता असणाऱ्या तमाम व्यासंगी वाचकांसाठीही महत्त्वपूर्ण ठरणार आहे.