आइनस्टाइन E=Mc2 अ थिअरी ऑफ लाईफ
प्रत्येकाजवळ काही ना काही शक्ती निसर्गाने दिली आहे. ती शक्ती जो ओळखतो, तो जीवनात प्रगतीच्या मार्गावर जातो. आज अनेक सुशिक्षित तरुण जीवनात योग्य संधीची वाट बघत बसतात. संधी कधीच चालून येत नाही, ती तुम्हाला निर्माण करावी लागते. योग्य वेळी योग्य निर्णय जेव्हा घेतला जातो, तेव्हा ती संधी बनते. जीवन E=Mc2 म्हणजे असे माझे ठाम मत आहे.जीवनालाही वेगळे वळण लावणारे हे सूत्र आहे. ज्यांना महत्त्वाकांक्षेने झपाटलेले आहे व या समयपटलांवर आपल्या कर्तृत्वाचे ठसे उमटवायचे आहेत, अशा लोकांना हे सूत्र नक्कीच एक आधार देईल. या सूत्राच्या आधारावर पुढच्या योजना तयार करून ते अंमलबजावणी करतील, तेव्हा खरोखरच एक नवीन वळण त्यांच्या जीवनास प्राप्त होईल. त्यांच्या यशाच्या तेजाने बघणार्यांचे डोळे दीपून जातील.