माइंड पार्लर
समुपदेशनाचे क्षेत्र हे मर्यादित न राहता काळाच्या ओघात त्याची व्याप्ती आणि स्वरूप हे बदलत चालले आहे. जागतिकीकरणामुळे, बदलत्या जीवनशैलीमुळे प्रत्येक वयोगटाच्या व्यक्तींच्या समस्या या वेगळ्या स्वरूपात मांडल्या जात आहेत. या समस्यांना आधुनिकतेची जोड आहे. अशा या आधुनिक स्वरूपाच्या समस्यांचे निराकरण करताना व्यक्तीला समुपदेशनाची गरज भासते, आणि या आधुनिक समस्यांच्या समुपदेशनासाठी आधुनिकता ही हवीच. नेमका हाच धागा पकडून लेखकाने ‘माइंड पार्लर’ ही आधुनिक समपुदेशन संकल्पना मांडली आहे.