विपणन व्यवस्थापन
‘विपणन’ ही एक अत्यंत आव्हानात्मक प्रक्रिया आहे. विपन ही संकल्पना आजच्या काळातील व्यावसायिक यशाचा मूलतंत्र बनली आहे. विपणन ही संकल्पना जरी केवळ व्यावसायिक संदर्भात वापरली जात असली, तरी ती एक व्यापक संकल्पना आहे. आजच्या स्पर्धायुक्त बाजारपेठेत उद्योजक व विक्रेत्यास आपल्या व्यवसायाची यशस्वी वाटचाल सुरू ठेवण्यासाठी विभिन्न, व्यावसायिक निर्णय अचूकरित्या घ्यावे लागतात. उत्पादन आणि वितरण ही उद्योग संस्थेची दोन महत्त्वाची कार्ये असून तीन एकमेकांस पूरक आहेत. आजच्या स्पर्धायुक्त परिस्थितीत जर बाजारपेठेत एखादे उत्पादन यशस्वी करायचे असेल तर त्या उत्पादकाने बदलत्या परिस्थितीचा अभ्यास करून फायदा घेतला पाहिजे.