विपणन आणि जाहिरात
बर्याच लोकांना विपणन (मार्केटिंग) म्हणजे फक्त जाहिरातीसारखे प्रचारात्मक क्रियाकलाप आहे, असे वाटते. मात्र, विपणनाची व्याप्ती जाहिरातीपेक्षा खूप विस्तृत आहे. जाहिरात हा विपणन प्रक्रियेचा फक्त एक भाग आहे. आधुनिक विपणन संकल्पनेची माहिती नसलेल्या अनेक विद्यार्थी/व्यावसायिक लोकांना असे वाटते की, विपणन एकतर उत्पादने विकणे किंवा जाहिरात क्रियाकलापांशी संबंधित आहे. काही दशकांपूर्वी, विपणन मोठ्या जाहिरातींसह उत्पादने विकण्यासाठीची मर्यादित संकल्पना होती; परंतु त्यानंतर विपणन विकसित झाले आहे आणि आता आधुनिक युगात विपणनाची व्याप्ती विक्री/प्रमोशनपेक्षा बरीच विस्तृत झालेली आहे.