व्यावसायिक अर्थशास्त्रीय विश्लेषण
अर्थव्यवस्थेतील लहानात लहान घटकांचा स्वतंत्रपणे अभ्यास करणार्या विश्लेषण पद्धतीला अंशलक्षी अर्थशास्त्र असे म्हणतात. ’Micro’ या ग्रीक भाषेतील शब्दाचा अर्थ अतिशय सूक्ष्म किंवा लहानात लहान असा भाग होय. एका अर्थाने हे आंशिक विवेचन आहे. यात विशिष्ट व्यक्ती, विशिष्ट पेढी, उद्योगसंस्था, विशिष्ट वस्तू इ. चा विचार केला जातो आणि त्यावरुन सर्वसमावेशक असे निष्कर्ष काढले जातात. म्हणूनच याला सूक्ष्मदर्शी, सौक्ष्मीक, सूक्ष्म, व्यष्टि, वैयक्तिक अथवा अंशलक्षी अर्थशास्त्र इ. नावांनी संबोधले जाते.