व्यावसायिक माहिती प्रणाली
पाठ्यपुस्तक, एम. कॉम. भाग २ सत्र ४ साठी व्यावसायिक माहिती प्रणाली या विषयासाठी तयार केले आहे यात व्यवसायातील विविध पैलू उदा.
व्यवसाय व्यवस्थापन, निर्णय घेणे, नियोजन
करणे यासाठी माहिती प्रणालीचा धोरणात्मक वापर या
संकल्पना स्पष्ट केल्या असून माहिती प्रणालीच्या मूलभूत संकल्पना सोप्या
भाषेद्वारे मांडण्याचा प्रयत्न आहे. पाठ्यपुस्तकमाहिती
प्रणालीच्या मूलभूत संकल्पना, घटक आणि पायाभूत सुविधांच्या आवश्यकतांवर लक्ष
केंद्रित करते. या पुस्तकाद्वारे विद्यार्थी क्लाउड कॉम्प्युटिंग, क्लायंट सर्व्हर, मशिन लर्निंग, सास इत्यादी विषयांचा अभ्यास करतील. पुस्तकाचे मुख्य
वैशिष्ट्य म्हणजे ते थोडक्यात पण समजण्यास सोप्या पद्धतीने लिहिलेले आहे जेणेकरून
विद्यार्थ्यांना केवळ संकल्पना समजण्यास मदत होणार नाही तर त्यांच्यामध्ये माहिती
प्रणालीबद्दल स्वारस्य निर्माण होईल.