भारताची अंतर्गत सुरक्षा, प्रश्न, आव्हाने आणि धोके
'भारताची अंतर्गत सुरक्षा प्रश्न, आव्हाने आणि धोके' या पुस्तकात भारताच्या अंतर्गत सुरक्षेला असलेले धोके, आव्हाने आणि प्रश्न यांची मांडणी ही सैद्धांतिक व कायदेशीर चौकटीत करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यानुसार केलेल्या प्रकरणांमध्ये भारताच्या अंतर्गत सुरक्षेचे अवलोकन पहिल्या प्रकरणात संक्षिप्त स्वरूपात मांडले असून, उर्वरित पंधरा प्रकरणांमध्ये भारताच्या अंतर्गत सुरक्षेचे प्रश्न, अंतर्गत सुरक्षेला असलेले समकालीन धोके, डावे उग्रवादी / नक्षलवाद्यांचे आव्हान, ईशान्य भारतातील बंडखोरी, जम्मू-काश्मीरमधील दहशतवाद, जातीय दंगे आणि हिंसा, विकास व उग्रवादाचा प्रसार, अराज्यक घठक आणि अंतर्गत सुरक्षा, किरणोत्सर्गी / आण्विक दहशतवाद, सायबर सुरक्षा, सीमा सुरक्षा, संघटित गुन्हेगारी, दहशतवाद्यांना पुरविण्यात आलेला पैसा व मनी लॉन्डरिंग या आव्हानांनी भारताची अंतर्गत सुरक्षा कशी प्रभावित होते, याबाबतची मांडणी केली आहे; त्याचबरोबर अंतर्गत सुरक्षा अबाधित ठेवण्याचा प्रयत्न करणारी सेनादले व सुरक्षा संस्था, केंद्र व राज्य सरकार यांचा त्यातील सहभाग यांची मांडणी केली आहे.