राज्यशास्त्राची ओळख
‘राज्यशास्त्राची ओळख’ प्रस्तुत ग्रंथात राजकीय सिद्धांत आणि त्या संदर्भातील राजकीय संकल्पना यांची मांडणी सुसंगत आणि शक्य तेवढ्या सोप्या व रूढ भाषेत केलेली आहे. व्याख्या आणि सिद्धांत किंवा मूलतत्त्वे आवश्यक तेथे मूळ इंग्रजीमध्ये आहेत तसेच त्यांचे मराठी भाषांतरही दिलेले आहे. विद्यार्थ्यांना विषय सहजगत्या समजावा म्हणून भाषा सोपी व साधी ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. पुस्तक अभ्यासल्यानंतर विद्यार्थ्यांना पूर्ण समाधान मिळेल आणि अधिक माहितीसाठी विद्यापीठाच्या परीक्षेसाठीच नव्हे, तर ‘नेट-सेट’ व स्पर्धात्मक परीक्षेच्या अभ्यासाकरिताही याची मदत होईल असा विश्वास आहे.