प्राकृतिक भूगोल परिचय व प्रात्यक्षिक
प्राकृतिक भूगोलाचा परिचय व प्रात्याक्षिके याचा अभ्यास केल्यानंतर आपल्या सर्वांच्या मनामध्ये भूगोल विषयाविषयी गोडी निर्माण होईल. प्रस्तुत पुस्तकात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सुधारित अभ्यासक्रमानुसार सर्व प्रकरणे साध्या, सोप्या व परीणामकारक भाषेत मांडण्याचा आम्ही प्रामणिक प्रयत्न केला असून सदर पुस्तक दोन भागात विभागलेले आहे. पहिल्या भागात प्राकृतिक भूगोलाचा परिचय व दुसर्या भागात प्रात्याक्षिके अशी रचना केलेली आहे. याबरोबरच योग्य ठिकाणी आकृत्या, तक्ते, विविध अभ्यास कर्माशी निगडीत संज्ञा आणि प्रश्नपत्रिकेचे स्वरूप यांचा समावेश केलेला आहे. या पुस्तकाचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक प्रकरणाच्या शेवटी बहुपर्यायी प्रश्न व त्याची उत्तरे दिलेली आहेत. याचा उपयोग सर्व विद्यार्थी व प्राध्यापक मित्रांना निश्चितच उपयुक्त ठरेल.