समाजशास्त्राची ओळख
प्राचीन काळापासून मानवी समाजाचा अभ्यास करून त्याच्या रचनेचे सत्य स्वरुप समजून घेऊन त्यावर सिद्धांतवजा अनुमाने काढण्याचे प्रयत्न निरनिराळ्या विचारवंतांनी केलेले आहेत. परंतु बहुसंख्य विचारवंतांनी समाजाचा अभ्यास करताना शास्त्रीय पद्धतीचा अवलंब न केल्यामुळे त्यांच्या निष्कर्षांना शास्त्रीय सिद्धांताचे मूल्य येऊ शकले नाही. ऐतिहासिक काळापासून समाजाचा अभ्यास करुन त्यावरुन त्याबाबतचे सिद्धांत तयार करण्याचे प्रयत्न विचारवंत लोकांनी केल्याचे आढळून येते.समाजशास्त्रात संघटित आणि असंघटित अशा दोन्ही प्रकारच्या समुदायाचे अध्ययन केले जाते, तर राज्यशास्त्रात केवळ संघटित समुदायाचे अध्ययन करण्यात येते. हा फरक देखील लक्षात घ्यावा लागतो. सामाजिक गतिशास्त्रात समाजाची वाढ व प्रगती कशी होते इत्यादी बाबींचा अभ्यास केला जातो.