प्राकृतिक भूगोल शिलावरण
‘प्राकृतिक भूगोल-शिलावरण’ पुस्तकाच्या लिखाणासाठी जास्तीत जास्त व अचूक संदर्भांचा वापर केलेला असून लिखाणाच्या भाषेत महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा विचार करण्यात आलेला आहे. प्राकृतिक भूगोलशास्त्रातील विविध संकल्पना सहज व सुलभ भाषेत स्पष्ट करण्याचा प्रयत्न केलेला असून संकल्पना अधिक स्पष्ट होण्याकरिता जास्तीत जास्त व अचूक आकृत्यांचा समावेश केलेला आहे. नेट-सेट परीक्षेच्या दृष्टिकोनातून मराठीतील संज्ञांना इंग्रजी नावे दिलेली आहेत. प्राकृतिक भूगोलशास्त्राचे अध्यापक व अध्ययनार्थींना पुस्तक निश्चितच उपयोगी ठरेल.