पर्यटनाचे अर्थशास्त्र
विद्यार्थ्यांचा दर्जा, आकलनशक्ती, क्षमता, पर्यटनाबाबत कुतूहल वा आवड इत्यादी बाबी लक्षात घेऊन ‘पर्यटन अर्थशास्त्र’ हा ग्रंथ लिहिण्याचा प्रयत्न केला आहे. या पुस्तकातील विविध घटक लिहिताना साधी व सोपी भाषा, संकल्पनात्मक स्पष्टता, विषयाच्या आकलनासाठी तक्ते, इत्यादींचा वापर केलेला आहे. प्रत्येक घटकाच्या शेवटी महत्त्वाचे प्रश्न म्हणून वस्तुनिष्ठ, लघुत्तरी व दिर्घोत्तरी प्रश्न दिलेले आहेत. प्रस्तुत ग्रंथामध्ये पर्यटनाची व्याख्या, ऐतिहासिक पार्श्वभूमी, प्रकार, स्वरूप, व्याप्ती, पर्यटनाला चालना, पर्यटन व्यवसायाची ओळख, उद्देश, महत्त्व, सार्जंट समिती, भारतीय व महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, पर्यटनाचा विकास, केंद्र व राज्य सरकारचे धोरण, योजनानिहाय तरतूद, पर्यटन व्यवस्थापनात सार्वजनिक-खाजगी भागीदारी, रोजगारक्षमता, पर्यटनाचे नवे प्रवाह, आर्थिक-सामाजिक व विविध पैलू, पर्यटनाचा शाश्वत विकास, पर्यटन उत्पादनाची मागणी-पुरवठा व पर्यटन बाजारपेठा या संकल्पनांचा अभ्यास करण्यात आला आहे.