परिचयात्मक अर्थशास्त्र
‘परिचयात्मक अर्थशास्त्र’ हे पुस्तक अत्यंत महत्त्वपूर्ण व उपयुक्त आहे. साधारणतः १८ व्या शतकाच्या उत्तरार्धापासून अर्थशास्त्र हे एक शास्त्र मानले गेले. अर्थशास्त्राला एक वेगळी वैज्ञानिक शाखा म्हणून मान्यता देण्याच्या दिशेने होणार्या संक्रमणात अॅडम स्मिथ यांच्या १७७६ मध्ये प्रकाशित झालेल्या ‘द वेल्थ ऑफ नेशन’ या मुख्य ग्रंथाचे मोठे योगदान आहे. त्यानंतर रिकार्डो, जे. एस. मिल, कार्ल मार्क्स, डॉ. मार्शल, फिशर, केन्स, फ्रिडमन, सॅम्युअल्सन, कुझनेट्स, हिक्स, लिओटीफ, मिर्डाल, ओहलिन, लेविस ते २०२३ च्या अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार विजेत्या गोल्डीनपर्यंत अनेक अर्थशास्त्रज्ञांनी या ज्ञान शाखेत मोलाची भर घातली आहे. प्रस्तुत पुस्तकाची लेखन मांडणी करताना सोपी भाषा, उपयोजित उदाहरणांचा समावेश करण्यात आला आहे. ज्यामुळे पुस्तकातील मजकूर अधिक मौल्यवान आणि विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरेल. विद्यार्थी व शिक्षकांना विशिष्ट अभ्यासक्रम सामग्री शोधणे, घटक अभ्यासासाठी सूचित करण्यास सोयीचे ठरते. विविध स्पर्धा, नेट-सेट परीक्षार्थी, अर्थशास्त्र विषयाचे विद्यार्थी, शिक्षक याकरिता निश्चितच उपयुक्त ठरेल.