आधुनिक भारताचा इतिहास (१८५७-१९५०)
‘आधुनिक भारताचा इतिहास’ या प्रस्तुत ग्रंथात भारतातील ब्रिटिश सत्तेचा उदय आणि विकास - संक्षिप्त आढावा, सामाजिक व धार्मिक सुधारक, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, मवाळवादी नेते, जहालवादी नेते, क्रांतिकारी चळवळ, महात्मा गांधी आणि स्वातंत्र्य चळवळ, भारत फाळणी आणि स्वातंत्र्य याविषयी सविस्तर मुद्देसूद साध्या-सोप्या व सुटसुटीत अशा भाषेत विवेचन केले आहे. भारताला स्वातंत्र्य मिळविण्यासाठी अनेक संघटना कार्यरत होत्या. त्यामध्ये अभिनव भारत, अनुशिलन समिती, आझाद हिंद सेना, गदर पार्टी, हिंदुस्थान सोशिअॅलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन इ. संघटना तसेच ब्रिटिश विरोधी सशस्त्र लढे याची माहिती प्रस्तुत ग्रंथात शब्दांकित केली आहे. महत्त्वाचे म्हणजे भारतीय इतिहासातील आधुनिकपणाचा हा उषःकाल होता. भारतीय समाजाचा सर्वांगीण प्रबोधनाचा हा काळ असून तो आर्थिक शोषणाचाही होता. हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून प्रबोधनाच्या नानाविध अंगांचे व आर्थिक विचारांचे प्रस्तुत ग्रंथातून विवेचन केले आहे. म्हणून हा ग्रंथ अभ्यासकांना व जिज्ञासू वाचकांना निश्चितच उपयुक्त ठरेल. ग्रंथाची मांडणी करताना अनेक ग्रंथांचा वापर केला आहे.