परिचयात्मक अर्थशास्त्र
अर्थशास्त्र विषयाची बांधिलकी, अध्ययन व अध्यापनाचा प्रदीर्घ अनुभव, तज्ञ तसेच अनुभवी व्यक्तींशी चर्चा-संवाद, चालु घडामोडी व मूळ संदर्भ ग्रंथांच्या आधारे हे पुस्तक लिहिलेले आहे. ‘परिचयात्मक अर्थशास्त्र’ या विषयाचे आकलन सुलभ व्हावे म्हणून प्रत्येक विभागाचे सुबोध आणि सूत्रबद्ध, विवेचनात्मक, योग्य त्या ठिकाणी कोष्ठक, आकृती याची सदर पुस्तकात अतिशय सोप्या भाषेत मांडणी करण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न असल्यामुळे विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त उपुक्त होईल. ‘परिचयात्मक अर्थशास्त्र’ हे पुस्तक स्पर्धात्मक परीक्षा तसेच नेट/सेट परीक्षांना जास्तीत जास्त उपयुक्त होईल, असाही प्रयत्न केलेला आहे. हे पुस्तक महाराष्ट्रातील विविध विद्यापीठातील प्राध्यापक व सर्व शाखेतील विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरेल.