पर्यावरण अभ्यास
एका बाजूला मानवाची प्रगती होत असतांनाच दुसर्या बाजूला पृथ्वीवरील नैसर्गिक व सांस्कृतिक पर्यावरणाचा आज दिवसेंदिवस र्हास होत आहे. राष्ट्राच्या भावी नागरिकांनी या विषयाचा अभ्यास करून पर्यावरण संतुलन राखण्यात महत्त्वाची भूमिका बजवावी हाच पर्यावरण अभ्यासाचा मुख्य हेतू आहे. नैसर्गिक पर्यावरण केवळ मानवासाठी नसून त्याचा उपयोग सर्व जीवसृष्टीसाठी असून जैवविविधता टिकून राहणे व पर्यावरण संतुलित असणे मानवाच्या चिरकाल अस्तित्वासाठी अत्यावश्यक आहे. पर्यावरणशास्त्राचे अध्ययन सुलभ होऊन विषयातील संकल्पना सहजगत्या विद्यार्थ्यांना समजाव्यात याकरिता अनेक सुबक आकृत्या, चित्र, तक्ते देण्यात आलेले असून महत्त्वाचे मुद्दे तारांकित करण्यात आलेले आहेत.