भारतातील निवडणूक प्रक्रिया
प्रा. डॉ. विलास सुर्यभान टाले हे मागील ११ वर्षांपासून राज्यशास्त्र विषयात अध्यापन करीत आहेत. त्यांनी राज्यशास्त्र या विषयात एम. ए., एम. फिल., नेट व पीएच. डी. इत्यादी पदव्या प्राप्त केल्या आहेत. त्यांनी आपल्या संशोधन लेखनातून अखिल भारतीय राज्यशास्त्र परिषद (IPSA) व महाराष्ट्र राज्यशास्त्र व लोकप्रशासन परिषद इ. परिषदेचे आजीवन सभासदत्व प्राप्त केले आहे. तसेच राज्यशास्त्र अध्ययन व संशोधन मंच बुलढाणा या परिषदेचे ते सचिव सुद्धा राहलेले आहेत. त्यांनी आजपर्यंत ३५ आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय, राज्य व विद्यापीठ पातळीवरील परिषद मध्ये विविध विषयांवर आपले शोधनिबंध सादर केले आहेत. तसेच त्यांचे मान्यता प्राप्त व यूजीसी लिस्टेड जर्नल तसेच अॅड जर्नल त्याचप्रमाणे केयर लिस्ट जर्नल यामध्ये सात शोधनिबंध प्रकाशित झाले आहेत.प्रा. डॉ. विलास टाले यांनी अनेक सामाजिक व राजकीय चळवळीमध्ये आपले योगदान दिलेले आहे. सध्या ते कला महाविद्यालय बुलढाणा येथे राज्यशास्त्र विभागाचे सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. याच महाविद्यालयात त्यांनी ५ वर्षे सांस्कृतिक विभाग प्रमुख, ५ वर्षे राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी म्हणून योगदान दिले आहे. सध्या महाविद्यालयामध्ये अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष (IQAC) चे समन्वयक म्हणून ते सेवा देत आहेत. त्याचप्रमाणे संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती या विद्यापीठाच्या राज्यशास्त्र अभ्यास मंडळाचे विद्यमान सदस्य म्हणून ते कार्यरत आहेत. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती या विद्यापीठाच्या मानव्य विद्या शाखेतील राज्यशास्त्र या विषयाचे संशोधक मार्गदर्शक म्हणून त्यांना मान्यता मिळाली आहे.