भारतीय कलावंत
महाराष्ट्रातील नामवंत निवडक पंचायंत्र कलावंतांचा कलाविद्यार्थी, कलाप्रेमी, वाचक यांना अभ्यासपर थोडक्यात जीवन प्रवास व कलाशैलींवर प्रकाश टाकणारे 'भारतीय कलावंत' सचित्र पुस्तक आहे. नाविन्याचा शोध घेणे हा मुळातच मानवाचा गुणधर्म. प्रत्येक व्यक्ती आयुष्य जगताना आपल्या अंतर्भूत गुणवैशिष्ट्यांचा जागर करत असतो. त्यांनाच आपण उपजत गुण म्हणतो तर काही गुणवैशिष्ट्ये आपण सरावाच्या माध्यमातून आत्मसात करतो ते कौशल्य जी गुणवैशिष्ट्ये मुळातच आपल्यात आहेत ती म्हणजे कला.. व सरावाच्या माध्यमातून आपण आत्मसात करतो ते कौशल्य.. कला व कौशल्याच्या माध्यमातून प्रत्येक कलावंत हा अलौकिक आनंद शोधत असतो. कारण अलौकिक आनंद हा दीर्घकाळ टिकणारा असतो यामुळे केलेले कार्य फलदायी झाले याचे समाधान वाटते. ज्ञानेश्वर माळी यांचे पुस्तक सामान्य विद्यार्थ्यांना, कलाप्रेमी यांना नक्कीच मार्गदर्शनपर ठरेल, अशी खात्री आहे.
(प्रस्तावनेतून...)