भारतीय ज्ञानप्रणाली (उपयुक्त ७०० प्रश्नोत्तरे)
प्राचीन भारतीय ज्ञानपरंपरेचे समग्र रूप पाहिले असता, असे दिसून येते की, भारतीय ज्ञानप्रणालींचे महत्त्व केवळ धार्मिक विचारांपुरते मर्यादित नसून विज्ञान, तत्त्वज्ञान, कला, शिक्षण आणि भाषा व कृषी या क्षेत्रांतही हे मोलाचे योगदान देणारे होते. संस्कृत, पाली आणि मागधी या भाषांमधून तात्त्विक आणि सामाजिक मूल्यांचा प्रसार झाला. नैतिकता, धर्म, आश्रम व्यवस्था आणि पुरुषार्थ यांच्याद्वारे समाजाची घडी बसविली गेली. शिक्षण, कृषी, व्यापार आणि तंत्रज्ञान या क्षेत्रांतील प्रगतीने देशाच्या आर्थिक आणि सामाजिक विकासाला चालना दिली. कला, स्थापत्यकला आणि आयुर्वेद यांमुळे जीवनशैलीत महत्त्वपूर्ण बदल घडले. या परंपरेचा आधुनिक काळातही उपयोग करून भविष्याचा विकास साधता येतो, हेच यातून सिद्ध झालेले दिसून येते.