आदिवासी संस्थानिकांचा इतिहास
‘आदिवासी संस्थानिकांचा इतिहास (सातपुडा परीसराच्या विशेष संदर्भात)’ हा ग्रंथ अनेक दृष्टीनी महत्वपुर्ण असुन खानदेशातील संशोधन कार्याच्या दृष्टीने अद्वितीय स्थान प्राप्त करणारा आहे. प्रादेशिक इतिहासाने विविध कालखंडाचा वेध घेतलेला असून विविध भौगलिक भागामधील वैविध्यपूर्ण राजकिय व सामाजिक जीवन जाणून घेणे अभ्यासकांना जाणून घेणे क्रमप्राप्त असते. ओधवती शैली, संशोधनात प्राथमिक व दुय्यम साधनाचा वापर, तर्कपुर्ण विश्लेषण, भूतकालीन घटनांबरोबर वर्तमानाशी साधलेला समन्वय, आशयपुर्ण विवेचनात्मक मांडणी या सर्व जमेच्या बाजू धरता प्रस्तूत ग्रंथ खानदेशच्या संशोधनात महत्वपूर्ण ठरेल.