सातपुड्यातील आदिवासींचा सामाजिक व आर्थिक इतिहास
डॉ. केशव पावरा यांनी आपल्या ‘सातपुड्यातील आदिवासींचा सामाजिक व आर्थिक विकास’ या प्रस्तुत ग्रंथात संशोधन साहित्यकृतीच्या माध्यमातून केवळ आदिवांसीच्या सामाजिक व आर्थिक विकासावर प्रकाश न टाकता, आदिवासींची अदिम धर्म संस्कृती व मुल्ये यावर देखील सखोल लेखन केलेले आहे. तसेच आदिवासी व्यापार, व्यवसाय व दळण वळणाच्या साधनांचा विकास याचा संदर्भांसह उहापोह केलेला आहे. ‘सातपुड्यातील आदिवासींचा सामाजिक व आर्थिक विकास’ या पुस्तकात तीन प्रकरणांत महाराष्ट्रातील तापी- नर्मदा खोर्यात व सातपुड्याच्या डोंगरदर्यात वसलेल्या पावरा व भिल्ल या आदिवासींच्या जीवनमुल्ये व आर्थिक विकासाची पारंपारिक साधने यांवर लक्ष केंद्रीत केलेले आहे.