भारतीय राज्यव्यवस्था
भारतीय राजकीय व्यवस्थेची माहिती विद्यार्थ्यांना व्हावी आणि यामधून विद्यार्थ्यांमध्ये जबाबदार नागरिक निर्माण होऊन भारतीय लोकशाही अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने प्रस्तुत ग्रंथाची निर्मिती करण्यात आलेली आहे. प्रस्तुत ग्रंथाचे लेखन व मांडणी साध्या, सोप्या, स्पष्ट व सुबोध भाषेत करण्याचा प्रयत्न केलेला आहे. प्रस्तुत ग्रंथाचे लेखन राज्यशास्त्राचे विद्यार्थी, अभ्यासक, संशोधक आणि सर्व वाचकांना उपयुक्त ठरेल, या व्यापक दृष्टिकोनातून केलेले आहे