व्यक्तिमत्त्व विकासासाठी संभाषण व लेखन कौशल्ये
जगातील सर्वच यशस्वी माणसे ही प्रभावी व्यक्तिमत्त्वाची धनी होती. ‘अष्टपैलू व्यक्तिमत्त्व’ या शब्दात काहींचा उल्लेख झालेला आपण वाचला, ऐकला असेल. एकाचवेळी निरनिराळ्या क्षेत्रात ठसा उमटवणार्या व्यक्तींच्या संदर्भात हा शब्दप्रयोग केला जातो. जीवनाच्या विविध क्षेत्रात ही मंडळी यशस्वी झाली याच्या अनेक कारणांत त्यांचे वाणीवर प्रभुत्व होते हेही आहे. आपल्या शब्दांच्या सामर्थ्यावर, आपल्या भाषाप्रभुत्वाच्या जोरावर त्यांनी लाखो लोकांच्या काळजावर राज्य केले. भाषेच्या संदर्भातील कौशल्यांचे महत्त्व लक्षात घेऊन सदरील संपादन तयार केले आहे. आजच्या स्पर्धेच्या युगात अग्रेसर राहण्यासाठी हा ग्रंथ नक्कीच हातभार लावेल. संभाषण व लेखन कौशल्ये यांच्याविषयी पायाभरणी करणारे आणि व्यक्तिमत्त्वाला दिशा देणारे हे महत्त्वपूर्ण संपादन आहे. त्या त्या क्षेत्रातील जाणकारांनी लिहिलेले लेख प्रस्तुत ग्रंथात असल्यामुळे या ग्रंथातील संपूर्ण विवेचनाला अनुभवांचा परिसस्पर्श आहे. मराठी भाषा व तिची कौशल्ये आत्मसात करून बाह्य जगात जाणारा विद्यार्थी आपल्या पायावर समर्थपणे उभा राहील याची संपादकांना खात्री आहे.