भारतीय अर्थव्यवस्था
भारत व रशिया हे आंतरराष्ट्रीय पातळीवरील महत्वाचे मित्रराष्ट्र आहेत. स्वातंत्र्यानंतर भारताने देखील विकासासाठी नियोजनाचा स्वीकार केला. पंचवार्षिक योजनांच्या माध्यमातून विशिष्ट क्षेत्रावर भर देऊन विकासाची गती वाढवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर अर्थव्यवस्थेतील प्राधान्यक्रम क्षेत्रांना चालना देण्यासाठी नव्वदच्या दशकानंतर खाजगीकरण, उदारीकरण व जागतिकीकरण या धोरणाचा स्वीकार करण्यात आला. यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसाठी विकासाच्या चारही दिशा मुक्त झाल्या. भारतीय लोकसंख्येत तरुण लोकसंख्येचे प्रमाण ३०% पेक्षा अधिक असल्यामुळे जगातील सर्वात तरुण लोकसंख्येचा देश म्हणून ओळखला जातो.