आदिवासी लोकगीतांचा अंतर्वेध
आदिवासी भिलाला बारेला जमात सातपुडा पर्वत रांगांत राहते. या पर्वतात इतरही जमाती राहता. पण त्यांच्यात आपसात कुठेही संघर्ष असल्याचे आढळत नाही. भिलाला बारेलांच्या लोकसंस्कृतीत लोककला, लोककथा, लोकगीते आणि लोकक्रिडा यांचा समावेश केला जातो. त्यांची राहणी, त्यांचा आहार-विहार, खान-पान, व्यवसाय - धंदा, त्यांचे सण- उत्सव, रीतीरिवाज, रूढी परंपरा यातून त्याच्या लोकजीवनाचे अंतरंग कळते.