मानसगान
मानसशास्त्र जनसामान्यांना व विद्यार्थ्यांना समजण्याकरिता लिहिलेल्या कवितांचा, बोधप्रद उदाहरणांचा आणि निरनिराळ्या वेळी केलेल्या भाषणांचा संग्रह म्हणजे प्रस्तुत काव्यसंग्रह होय. या पुस्तकात ४१ कविता आहेत. मानसशास्त्रविषयी सांगत असतांना कवीने तरुणांना राष्ट्रीय चारित्र्याची हाक देखील दिली आहे. मानसशास्त्राची पद्यात्मक मांडणी आहे. मानसशास्त्र दैनंदिन जीवनात उपयोगी पडणारे शास्त्र, माणूस समजून घेण्याचे, त्याला घडविण्याचे व त्याला ओळखण्याचे शास्त्र त्यामुळे माणसामध्ये अवधान प्रक्रिया कशी असते, अध्ययन कसे होते व त्याचे प्रकार कोणते, परिणामकारक संप्रेषणकशाला म्हणतात, संवेदन म्हणजे नेमके काय, बोध-अबोध यातील फरक कसा करावा, प्रेरणांची उतरंडकशी असते इत्यादी अत्यंत उत्कटतेने कवीने वाचकांना सांगितले आहे.