आधुनिक राजकीय विश्लेषण
आधुनिक राज्यशास्त्राला राजकीय विश्लेषण या नावाने ही ओळखले जाते. राजकीय जीवनातील घडामोडी, समस्या व विविध प्रश्नांचा विचार आधुनिक शास्त्रीय दृष्टीकोनाच्या साहाय्याने वास्तवतेवर आधारित केला जात आहे. सदरील पुस्तकातून आपणास राजकीय विश्लेषण, राजकीय व्यवस्था, राजकीय सामाजिकीकरण, राजकीय संस्कृती, राजकीय सहभाग, सत्ता, प्रभाव, अधिकार व अधिमान्यता, राजकीय श्रेष्ठीजन/नेतृत्व, राजकीय भरती, राजकीय संसूचन व लोकमत, राजकीय जाती, राजकीय बदल, राजकीय विकास, राजकीय आधुनिकीकरण वगैरे विविधांगी मुद्द्यांची मांडणी करतांना भाषा साधी, सरळ, सोपी वापरण्याचा प्रयत्न केला आहे. हे पुस्तक कोणत्याही राजकीय व्यवस्था, प्राध्यापक, विद्यार्थी मित्र, संशोधक यांना निश्चितच उपयोगी पडणारे आहे. पारंपारीक व आधुनिक राज्यशास्त्रातील फरक, नविन विचारसरणी, नविन दृष्टीकोन जाणून घेण्यास मदत होणार आहे.