भारतीय राजकीय विचार
भारतील विचारवंताचे विचार म्हणजे वाचक रसिकांसाठी एक महान पर्वणीच आहे. भारतीय विचारवंतांच्या विचारांचा प्रवास वर्षानुवर्षांचा आहे. अगदी प्राचीन काळापासून आधुनिक काळापर्यंत अनेक विचारवंतांन आपल्या विचारांच्या माध्यमातून सामाजिक, राजकीय, आर्थिक आणि इतरही क्षेत्रात प्रबोधनाचे महान कार्य केलेले आहे. त्यांच्या या प्रबोधनरूपी विचारपुष्पातून समाजीवनात अनेक परिवर्तने आजपर्यंत झालेली आहेत. भारतीय विचारवंतांनी मांडलेले विविध विचार म्हणजे आपल्यासमोरील दीपस्तंभच आहे.