साहेब रोहिदास पाटील यांचा ग्रामीण राजकीय नेतृत्वाचा अभ्यास
यशस्वी नेता होण्यासाठी आवश्यक असलेला गुणांचा आविष्कार दाजीसाहेबांच्या व्यक्तिमत्वातून सहजपणे स्पष्ट होतो. त्यांचे संघटन कौशल्य, प्राध्यान्यक्रम असलेले नियोजन, अभ्यासूवृत्ती, मुल्यांना प्राध्यान्य देण्याची वृत्ती, निष्ठावान प्रवृत्ती, शब्दाला जगणारा माणसू, मित्रसंग्रह वाढविणारा स्पष्टवक्ता, निर्णायक परिस्थितीत निर्णय घेण्याची क्षमता असलेला इत्यादी गुणांमुळे त्यांचे नेतृत्व सतत वृद्धींगत होतांना दिसते.