अर्थजागर : आर्थिक जाणीवा समृद्ध करणारे
‘अर्थजागर’ या पुस्तकात सात प्रकरणे असून पुस्तकाची सुरवात भारतीय नाणे धोरणाचे अर्थकारणावरील परिणाम या प्रकरणाने होऊन, नोटाबंदी, अर्थव्यवस्थेची वाटचाल, बँकिंग उद्योगातील घडामोडी, करसुधारणा, महाराष्ट्रातील जनजीवन व कृषी समस्या, जागतिक आर्थिक आणि राजकीय घडामोडीचे भारतीय अर्थव्यवस्थेवरील संभाव्य परिणाम या शेवटच्या प्रकरणाने होते. प्रत्येक प्रकरणात समाविष्ट उपविषय जनतेच्या जिव्हाळ्याचेव समाजजीवनावर खोलवर परिणाम करणारे आहेत.