भरतीपूर्व प्रशिक्षणार्थी आणि खेळाडूंसाठी मैदानी खेळांचे प्रशिक्षण
डॉ. मारतळे स्वतः क्रीडा शिक्षक असल्यामुळे शारीरिक शिक्षण आणि खेळ हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे. त्यामुळे या पुस्तकात त्यांनी अधिकारवाणीने मैदानी खेळाबाबतची विस्ताराने माहिती दिली आहे. आज एकीकडे पालकांचा खेळाकडे पाहण्याचा दृष्टीकोन नकारात्मक झाला की काय अशी शंका येण्यासारखी परिस्थितीअसतांना खेळाविषयी आवड असणार्या तरुणांना खेळातूनही कसा रोजगार प्राप्त होऊ शकतो याबद्दलची माहिती डॉ. मारतळे यांनी या पुस्तकाद्वारे दिली असल्यामुळे पालकांचा दृष्टीकोन सकारात्मक व्हायला निश्चितच हातभार लागेल अशी आशा आहे.