पर्यावरण भूगोलशास्त्र
जैविक उत्क्रांतीचा अंतिम टप्पा मानवास मानले जाते. मानव आपल्या सर्जनशीलतेच्या व विचारांच्या बळावर त्याच्या सभोवतालच्या परिस्थितीत बदल घडवून आणतो. आज मानवाने पर्यावरणात अनेक आमूलाग्र बदल घडवून आणल्यामुळे पृथ्वीवर नैसर्गिक पर्यावरणाचे असंतुलन निर्माण झाले आहे. पर्यावरण संतुलन राखणे व संवर्धन करण्यासाठी पर्यावरणशास्त्राच्या अभ्यासाची गरज निर्माण झाली आहे.