बुलढाणा जिल्ह्यातील फळबाग
भारतीय अर्थव्यवस्था ही ‘कृषिप्रधान अर्थव्यवस्था’ म्हणून आजही ओळखली जाते. आजही ६७% लोकसंख्या शेतीवरच अवलंबून आहे. आज भारतीय शेतीसमोर अनेकविध गंभीरसमस्या निर्माण झालेल्या आहेत. भारतीय शेतकरी संकटात सापडून आत्महत्त्येस प्रवृत्त होत आहे. मालाला कमी भाव, भांडवलाचा अभाव, गोदामाच्या सोईंचा अभाव, सरकारचे दुर्लक्ष, शेती संशोधन व तंत्रज्ञानाचा अभाव, आधुनिक शेती अवलंब न करणे, मान्सूनवरील निर्भरता, सावकारीचा पाश वगैरे विविध कारणांनी भारतीय शेतकरी हताश होत आहे. शेतकर्यांनी पारंपारिक पद्धतीने शेती न करता फळबाग लागवीकडे वळले पाहिजे यासाठी ‘बुलढाणा जिल्ह्यातील फळबाग’ हे पुस्तक लिहिले आहे. प्रस्तुत पुस्तकात फळबाग व्यवसायासाठी केंद्र व राज्य सरकारच्या अनेक योजनांची माहिती तसेच विविध आधुनिक नविन बि-बियाणे, फळजातींचे कलमे व रोपे यांची महत्त्वपूर्ण माहिती सादर केलेली आहे.