ग्रंथालय आणि माहितीशास्त्र : आधुनिक तंत्र आणि पद्धती
आजच्या विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगात ग्रंथालयाची भूमिका मोलाची आणि बदलली आहे. विज्ञान-तंत्रज्ञानाच्या वाढत्या प्रगतीमुळे ग्रंथालयाला सुद्धा देत असलेल्या सेवांमध्ये परिस्थितीनुसार बदल करणे क्रमप्राप्त आहे. आजच्या वाचकाला हवी असणारी माहिती ग्रंथालयात उपलब्ध नसल्यास तात्काळ इंटरनेटच्या माध्यमातून हवी ती माहिती कोणत्या ग्रंथालयात उपलब्ध होऊ शकेल व ती तात्काळ पुरविण्याची जबाबदारी ग्रंथालयावर येऊन पडली आहे. म्हणून आज विद्यापीठ अनुदान आयोगाकडून इन्फिलीबनेटसारखे उपक्रम राबविले जात आते. या उपक्रमांतर्गत भारतातील विद्यापीठे व निवडक महाविद्यालये आणि संस्थांची ग्रंथालये एकमेकास जोडण्याचे काम चालू आहे. आजच्या माहितीच्या विस्फोटात माहितीचे महत्त्वही माहिती लक्षात घेता ग्रंथालयाचे महत्त्वही मिळविण्याच्या दृष्टीने वाढल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.