अशी पाखरे येती...
परस्परोपग्रह जीवनाम्’ हा मंत्र स्वीकारत समाजातील सर्व स्तरांतील विद्यार्थ्यांना उच्चशिक्षण देणे व त्यातून खर्या अर्थाने मानवतेचे कल्याण साधणे, हे मुख्य उद्दिष्ट उराशी बाळगून या महाविद्यालयाची स्थापना झाली. बदलत्या जीवनप्रवाहात सतत नावीन्याचा ध्यास घेत महाविद्यालय काळाची पावले ओळखत विद्यार्थ्यांना पारंपरिक शिक्षणाबरोबरच आधुनिक व्यावसायिक, रोजगाराभिमुख दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण उपलब्ध व्हावे यासाठी सतत कटिबद्ध आहे. या महाविद्यालयाच्या स्थापनेपासून आजतागायत या ज्ञानवृक्षाच्या छायेत अनेक विद्यार्थी घडले आणि विविध क्षेत्रांमध्ये नावलौकिक मिळविला. ‘विद्यार्थीहित हेच आमचे हित’ या संकल्पपूर्तीसाठी महाविद्यालय नेहमीच प्रयत्नशील आहे व राहील. या पुस्तकाच्या माध्यमातून आमचे माजी विद्यार्थी आणि प्राध्यापकांना हक्काचा ‘विचारमंच’ मिळावा, जुन्या आठवणींना उजाळा मिळावा, त्यांच्या आयुष्यातील जडणघडण अन् अनुभवांची नोंद व्हावी. त्यांनी त्यांचे विचार, कल्पना, वैचारिक प्रगल्भता, कौशल्य या पुस्तकातून मांडले आहे. प्रस्तुत पुस्तक हे सर्वांना मार्गदर्शक ठरेल, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.