भारत प्रवास आणि पर्यटन
अनादिकाळापासून मानवाला पर्यटन करण्याबद्दल प्रचंड कुतूहल असल्याचे प्रकर्षाने दिसून येते. मानवाला गतकालीन ऐतिहासिक घटना, ऐतिहासिक स्मारके, मंदिरे, राजवाडे, घरे, किल्ले, गुहा, लेणी इत्यादी भारताच्या ऐतिहासिक प्राचीन ठेव्याला भेटी देऊन त्या स्थळांबद्दल महत्त्वपूर्ण माहितीचे ज्ञान अर्जित करावे, अशी तीव्र स्वरूपाची जिज्ञासा मानवाच्या मनात प्रामुख्याने आढळून येते.ही जिज्ञासा पूर्ण करण्यासाठी व पर्यटनाबद्दल असलेली आवश्यक माहिती मिळविण्यासाठी संबंधित पुस्तकातील पर्यटन संकल्पना आणि त्याचे प्रकार, हेतू, उद्दिष्टे, तसेच पर्यटनाचे नियोजन कसे करावे, पर्यटनस्थळांची वाहतूक व्यवस्था आणि तेथील साधने, निवासव्यवस्था आणि त्यांचे प्रकार यांसह भारतातील निवडक ऐतिहासिक पर्यटन स्थळांची माहिती अत्यंत साध्या, सोप्या भाषेत मांडली आहे. त्यामुळे पर्यटक, विद्यार्थी, अभ्यासक, संशोधक आदींना हे पुस्तक उपयोगी व मार्गदर्शक ठरेल, यात शंका नाही.