संस्कृतसुरभि:
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापिठाशी संलग्नित मूळजी जेठा महाविद्यालयाला नुकताच स्वायत्त दर्जा प्राप्त झाला आहे. उत्तर महाराष्ट्र परिसरात संस्कृत विषय फार कमी महाविद्यालयात शिकवला जातो. विद्यार्थ्यांना संस्कृतभाषेची गोडी निर्माण व्हावी आणि संस्कृत विषयाची भीती मनातून दूर व्हावी या अनुषंगाने स्वायत्त मूळजी जेठा महाविद्यालयाच्या अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांना सहज झेपेल आणि संस्कृत भाषेतील अनमोल साहित्याच्या ज्ञानाची ओळख होईल या उद्दिष्टाने या ‘संस्कृतसुरभिः’ पुस्तकाचे संपादन करण्यात आले आहे. यातील वेचे निवडताना संस्कृत साहित्यातील विविधता आणि आकर्षकता याकडे लक्ष केंद्रीत केले आहे. या ग्रंथात अत्यन्त सुलभ पण उद्बोधक, रंजक व मनाला रुचणार्या प्राचीन व आधुनिक संस्कृत साहित्याचा समावेश करण्यात आला आहे.