विनोबा आणि शिक्षण
विनोबा आणि शिक्षण
विनोबा आणि शिक्षण
विनोबा आणि शिक्षण

विनोबा आणि शिक्षण

  • ISBN : 978-93-91712-31-0
  • Author : प्रा. डॉ. साहेबराव भुकन
  • Edition : 15 November 2021
  • Weight : 270
  • Size : 5.5 x 8.5
  • Total Page : 256
  • Delivery : 2-7 business days
  • Pay Using : Cheque / DD
  • Category : Social Science,Marathi & Literature,
  • Sub Category : शिक्षणशास्त्र,वैचारिक पुस्तके,संदर्भ पुस्तके,
360 450 20 % OFF
Qty

0 REVIEW FOR विनोबा आणि शिक्षण

ADD A REVIEW

Your Rating

विनोबा आणि शिक्षण

आचार्य विनोबा भावे यांचा परिचय भारतीय जनतेला 'पहिले वैयक्तिक सत्याग्रही', 'भूदान यज्ञांचे प्रवर्तक', 'महात्मा गांधींचे आध्यात्मिक वारसदार' असा आहे; पण विनोबा हे मूलतः तत्त्वचिंतक आणि शिक्षणवेत्ते होते. त्यांना अध्ययन-अध्यापन कार्यात विशेष स्वारस्य होते. ते भारतातीलच नव्हे; तर जगातील एक श्रेष्ठ शिक्षणतज्ञ, शिक्षणतज्ज्ञ आणि विचारवंत आहेत. त्यांनी स्त्री शिक्षणालासुद्धा महत्त्व दिले आहे. मुलामुलींच्या एकत्र शाळा असल्या पाहिजेत. त्यातूनच स्त्री-पुरुष भेद दूर होऊ शकेल. आपण प्रथमतः ‘मातृदेवो भव' आणि नंतर 'पितृदेवो भव' असे वंदन करतो; त्याबरोबर विनोबांनी 'आचार्य देवोभव' यावर भर दिला आहे.  'विनोबा आणि शिक्षण' हा ग्रंथ म्हणजे विनोबांच्या जीवनाचा सार होय. या ग्रंथातून भारतीय शिक्षणप्रणाली, शिक्षणाची ध्येये, उद्दिष्टे, शिक्षणाचा अभ्यासक्रम आणि शिक्षणातील अध्यापन पद्धती यांचा सर्वांगीण परिचय झाला आहे. विनोबा हे भारतीय संस्कृतीतील ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व असून, त्यांची अखंड ज्ञानसाधना आणि जीवनपद्धती हा आपल्या सर्वांसाठी एक मोठा आदर्श आहे. या आदर्शाचा अंगीकार करून आपली स्वतःची पायवाट निर्माण करण्यासाठी हा ग्रंथ मार्गदर्शक आहे. व्यक्तीला जीवनात आध्यात्मिक, सामाजिक, कौटुंबिक आणि व्यावहारिक क्षेत्रात विकसित होण्यासाठी विनोबांनी दिलेली जीवनसूत्रे व विचारप्रणाली सर्वांसाठी मोलाची आहेत. या ग्रंथसाधनेतून विनोबांची विचारप्रणाली सर्वांसाठी खुली झाली आहे...