संशोधनाच्या दिशा
पिंपळनेर (ता. साक्री, जि. धुळे) येथील कर्मवीर आ. मा. पाटील कला, वाणिज्य व कै. एन. के. पाटील विज्ञान महाविद्यालयातील प्राध्यापक प्रबोधिनीच्या माध्यमातून प्राध्यापकांनी विद्याबाबत संशोधन । दृष्टिकोनातून भिन्न विषयावर आपल्या व्याख्यानातून संशोधनात्मक बाजू स्पष्ट केली. व्याख्यानास प्राध्यापक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित राहन चर्चात्मक अगर प्रश्नोत्तराच्या माध्यमातून निरनिराळ्या विषयांचे मंथन केले. त्यातून महाविद्यालयात विषय संशोधन व्याख्यानाची एक पद्धत अगर संस्कार यातून संबंधित घटकांमध्ये निर्माण झाला आहे. त्यांचे संशोधन लेखी स्वरूपात माहिती गोळा करून पुस्तकाच्या माध्यमातून पोहोचावी, हा व्यापक विचार ठेवून प्राध्यापकांचे आपापल्या विषयाचे संशोधन निबंध एकत्र करण्यात आले. त्यातून 'संशोधनाच्या दिशा' हे पुस्तकस्वरूपात आकाराला आले. हे पुस्तकरूपी ज्ञान संशोधक विद्यार्थी, प्राध्यापकांसह सर्वांनाच उपयुक्त ठरेल, असा विश्वास आहे.