दृक्-श्राव्य माध्यमासाठी शैक्षणिक कार्यक्रम लेखन
दृक्-श्राव्य कार्यक्रम निर्मितीचे क्षेत्र हे अतिशय व्यापक व सखोल क्षेत्र आहे. यात निर्मितीपूर्व प्रक्रिया, निर्मिती प्रक्रिया व निर्मित्योत्तर प्रक्रियांचा समावेश होतो. त्यामुळे दृक् - श्राव्य कार्यक्रमांसाठी लेखन करणाऱ्या शिक्षकांना म्हणजेच नवोदित संहिता लेखकांना किंवा पटकथाकारांना या दृक् - श्राव्य कार्यक्रम निर्मितीच्या प्रत्येक टप्प्यावरील अंतर्भूत घटकांशी तोंड ओळख व्हावी व संहिता लेखनाची प्रक्रिया प्रत्येकाला अगदी सहज व सोप्या पद्धतीने समजावी म्हणून या ग्रंथाचे लेखन करण्यात आलेले आहे. हा ग्रंथ दृक् - श्राव्य कार्यक्रम निर्मिती संदर्भातील नवोदितांच्या शंकांचे पूर्णत: समाधान करेल व त्यांच्या पसंतीस उतरेल यात कोणतीही शंका नाही.