संत मुक्ताई पालखी सोहळा
भागवत धर्मात संतश्रेष्ठ मुक्ताईंचे स्थान सर्वश्रेष्ठ आहे. मुक्ताई ज्ञानेदवांच्या भगिनी होत्या. त्यांचा आध्यात्मिक अधिकार असाधारण होता. सर्व सिद्धी त्यांना जन्मजात प्राप्त झाल्या. त्यांची प्रज्ञा ईश्वरी होती. त्या साक्षात चित्कला होत्या. ज्ञानदेवांच्या समाधीनंतर त्या ‘तापी’-‘पूर्णा’ संगमावर आल्या. त्यांच्या तपाचा चांगदेवांना साक्षात्कार झाला. चांगदेवांनी त्यांना सद्गुरू मानले. अशा मुक्ताईंची पालखी गेली काही वर्षे नेमाने आषाढीला पंढरपूरला जाते. मुक्ताईंच्या पालखी सोहळ्याला दोनशे वर्षे पूर्ण होताहेत. मुक्ताईनगर ते पंढरपूर हा मुक्ताईंच्या पालखीचा प्रवास खडतर आहे. या पालखी प्रवासाचे वर्णन हरिभक्त परायण श्री. तुळशीराम महाराज गुट्टे यांनी या पुस्तकात नकाशासह सविस्तर केले आहे.