शिक्षणाचे मानसशास्त्रीय अधिष्ठान
शिक्षण प्रक्रियेमध्ये विद्यार्थी हा केंद्रस्थानी आहे. त्याला कोणत्याही प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागता कामा नये, त्याच्या अध्ययनाला सहाय्य करणे हे शिक्षकाचे कर्तव्यच आहे. शिक्षण घेत असतांना विद्यार्थ्याला प्राचीन भारतीय शिक्षणाची ध्येये, उद्दिष्टे, संकल्पना, व्याख्या यांची ओळख व्हावी तसेच मानसशास्त्राचा अर्थ, व्याख्या, व्याप्ती, स्वरूप यासोबतच शिक्षण आणि मानसशास्त्राचा संबंध काय आहे ? वर्तनाचा अभ्यास करण्याच्या विविध पद्धती, वाढ आणि विकासाचे टप्पे, विविध अवस्थांमधील मानसिक, भावनिक आणि सामाजिक विकास, व्यक्तिभेद याबाबत ओळख व्हावी त्याचबरोबर अध्ययन संदर्भात संकल्पना, वैशिष्ट्ये, अध्ययनाच्या विविध उपपत्ती, अध्ययन संक्रमण तसेच अध्ययनावर परीणाम करणाऱ्या घटकांची माहिती प्राप्त व्हावी या उदात्त व प्रामाणिक हेतूने डॉ. पकजकुमार शांताराम नन्नवरे या आमच्या विद्याव्यासंगी, अभ्यासू, विद्यार्थीप्रिय मित्राने प्रस्तुत पुस्तक लेखनाचा प्रपंच करण्याचा प्रयत्न केला आहे, एवढेच नव्हे तर या प्रयत्नास तडीस नेण्यासाठी जे परीश्रम करावे लागतात ते देखील केले आहेत. शिक्षणाचे मानसशास्त्रीय अधिष्ठान भाग - एक या पुस्तकाचे वैशिष्ट्य म्हणजे पाठ्यक्रमात असलेल्या सर्वच घटक व उपघटकांची लेखकाने सांगोपांग चर्चा अतिशय सुलभ व सोप्या पद्धतीने केलेली आहे.