भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास
१८ व्या शतकाच्या मध्यापासून ते इ.स.१८५७ पर्यंत भारतात ब्रिटिश सत्तेची पायाभरणी झाली आणि ही ब्रिटिश सत्ता सहजासहजी प्रस्थापित झाली नसून या प्रक्रियेत ब्रिटिशांना भारतीय शेतकरी, जमीनदार, आदिवासी यांच्या सशस्त्र विरोधाला तोंड द्यावे लागले. ब्रिटिश विरोधी सशस्त्र लढे अशा ब्रिटिश प्रशासनाचा तपशील या ग्रंथात दिलेला आहे.
भारतीय इतिहासात स्वातंत्र्य चळवळीचा कालखंड हा अतिशय रोमहर्षक असा कालखंड मानला जातो. भारतीय स्वातंत्र्य चळवळीच्या काळातील घडामोडी अथवा घटनांमध्ये स्वातंत्र्याच्या प्राप्तीसाठी प्रयत्न करणार्या स्वातंत्र्य सेनानी व देशभक्तांचे योगदान, इंग्रज सरकारचे धोरण, ईस्ट इंडिया कंपनीच्या स्थापनेपासून ते भारताची फाळणी होऊन भारताला स्वातंत्र्य प्राप्ती होईपर्यंतच्या कालखंडाचे सविस्तर मुद्देसूद साध्या-सोप्या व सुटसुटीत अशा भाषेत विवेचन केले आहे. महत्त्वाचे म्हणजे भारतीय इतिहासातील आधुनिकपणाचा हा उषःकाल होता. भारतीय समाजाचा सर्वांगीण प्रबोधनाचा हा काळ असून तो आर्थिक शोषणाचाही होता. हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून प्रबोधनाच्या नानाविध अंगांचे व आर्थिक विचारांची माहिती प्रस्तुत ग्रंथात शब्दांकित केली आहे. म्हणून हा ग्रंथ अभ्यासकांना व जिज्ञासू वाचकांना निश्चितच उपयुक्त ठरेल.