स्वातंत्र्याची ऊर्जाक्षरे
खानदेशच्या भूमीतील भूमिपुत्रांनी भारतीय स्वातंत्र्य लढ्यात दिलेले अतुलनीय योगदान आमचा अनमोल ठेवा आहे. भारतीय स्वातंत्र्याची चळवळ टिळक-म. गांधींच्या नेतृत्वात जोर धरत असताना खानदेशातील देशभक्तांनी दिलेले योगदान शब्दात व्यक्त करता येत नाही इतके मोठे व महत्त्वपूर्ण आहे. त्यातील काहींना क्रांतिकारक, देशभक्तांना इतिहासात स्थान मिळाले, परंतु खूप मोठ्या प्रमाणात या क्षेत्रातील घटना, प्रसंग आणि इतिहासाचा अभ्यास करण्यासाठी खूप काही जागा अजून रिक्त आहे. भारतीय स्वातंत्र्य चळवळीच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने खानदेशातील प्रमुख भूमिका, परंतु दुर्लक्षित राहिलेल्या देशभक्त, क्रांतिकारकांच्या कार्याचा अल्पसा धांडोळा घ्यायचा प्रयत्न या निमित्ताने ऐतिहासिक मूल्य व ठेवा असलेल्या विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या अभ्यासपूर्ण लेखांमधून ‘स्वातंत्र्याची ऊर्जाक्षरे’ या दर्जेदार ग्रंथाची निर्मिती करण्यात आली आहे.