भारतीय राजकारणाची ओळख
महाराष्ट्रातील बहुतेक विद्यापीठामध्ये भारतीय शासन आणि राजकारण,भारतीय राजकारणाची ओळख, भारतीय गणराज्याचे शासन आणि राजकारण अशा विविध शीर्षकांतर्गत भारतीय राजकीय व्यवस्थेचा अभ्यास केला जातो. भारतीय राजकीय व्यवस्थेची माहिती विद्याथ्यारना व्हावी आणि यामधून भारतीय लोकशाही अधिक सक्षम करण्याच्या तसेच विद्याथ्यारमधून जबाबदार नागरिक घडवण्याच्या उद्देशाने प्रस्तुत संदर्भग्रंथाची निर्मिती करण्यात आलेली आहे. भारतीय संविधानावर कार्यरत असणारी भारतीय राजकीय व्यवस्था विद्याथ्यारना साध्या, सोप्या भाषेत समजावून देण्याचा प्रयत्न या संदर्भग्रंथाच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे.