लोकसंख्याशास्त्र सिद्धान्त व विकास
आंतरविद्याशाखीय अभ्यासाचे वाढते महत्त्व व बदलत्या काळात नवीन संकल्पना व बदलते प्रवाह लक्षात घेता ग्रंथाची निर्मिती विस्तृत व व्यापक स्वरुपात मांडण्याचा प्रयत्न ‘लोकसंख्याशास्त्राचा सिद्धान्त व विकास’ मध्ये करण्यात आला आहे. लोकसंख्याशास्त्र या पुस्तकाची विभागणी पाच प्रकरणात केली आहे. लोकसंख्याशास्त्र या विषयाची शास्त्रोक्त मांडणी लोकसंख्या अभ्यास व इतर शास्त्रे यातील आंतरसंबंध स्पष्ट करुन संबंधित विषयाला सैद्धांतिक बाजूची जोड देण्याचा प्रयत्न केलेला आहे. कालपरत्वे लोकसंख्याविषयक अनेक सिद्धांत विकसित झाले. ज्यामध्ये प्रामुख्याने माल्थस यांनी केलेल्या संशोधनाबाबत उत्सुकता निर्माण होऊन नवनवे अभ्यासक या प्रश्नाकडे आकृष्ट होऊ लागले. लोकसंख्या विषयक आतापावेतो झालेल्या सैद्धांतिक मांडणीचे विश्लेषण करण्यात आलेले आहे.